स्वाती घोसाळकर

कल्याण: कल्याणशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भावनिक नाते आहे. कल्याणचा गड शिवसैनिकांनी आपल्या घामाने राखलाय. कल्याणच्या या स्वाभिमानी भूमित शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मतदार करून गाडा असा आदेश आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधिल शिवसैनिकांना दिला.

महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणपश्चिमचे उमेदवार सचिन बासरे, कल्याण पुर्वचे उमेदवार धनंजय बोडारे आणि अंबरनाथचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी कल्याणमधिल दादासाहेब गायकवाड मैदानावर आयोजित भव्य सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या आवेशपुर्ण भाषणाने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकात चैतन्य निर्माण केले. जय शिवाजी, जय भवानीच्या नाऱ्यांनी अवघा आसमंत दणादून गेला.

सचिन बासरे , राजेश वानखेडे आणि धनंजय बोडारे हे कडवट शिवसैनिक आहेत. यांना निवडूण देण्याची जबाबदारी तुमची आहे. यावेळी धनंजय बोडारेंचा विशेष उल्लेख करताना ठाकरे म्हणाले की या बोडारेंची अवस्था माझ्यासारकी झाली आहे. हे स्वता आपल्या शिवसेनेत आहेत आणि त्यांचा भाऊ दुसऱ्या पक्षात गेलाय. ठाकरेंच्या या मिश्कील टिप्पणीवर सभेत एकच हंशा पिकला.

काल राज ठाकरे कल्याण पश्चिममध्ये सभा न घेताच परतले. माझी तब्येत नाजूक आहे मी केवळ तुम्हाला भेटायला आलोय असे सांगत राज ठाकरे यांनी काल सभेतून लेगेचच काढता पाय घेतला होता. याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मी तब्येतीने बोलणार आहे. राज ठाकरेंना मारलेल्या या कोपरखळीने उपस्थितांमध्ये एखच हशा पिकला.

राज ठाकरेंच्या उमेदवाराने कल्याण पश्चिममध्ये महायुतीच्या उमेदवाराची जास्त मते खाऊ नयेत यासाठी प्रचार कमी केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी वरील टोला हाणला होता.

दरम्यान, ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *