अनिल ठाणेकर
ठाणे : १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल, हा माझा वादा आहे, टोरन्ट मुक्त व ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखवणार, हे माझे वचन आहे, अशी जाहीर घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली.
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मेक कंपनी समोरील पटांगणात, मुंब्रा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसत होती..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, डाॅ अलतमाज फैजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, डाॅ मुमताज शहा, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, वहिदा खान, नासिर खान, नजिमुद्दीन मलिक, मुख्तार अन्सारी, मोहसीन शेख, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे, राजा सूर्यवंशी, नसीम खान, सिजर सोनी, विष्णू भगत, मयुर सारंग, ऐय्याज हसन,स्मीता खैरे, नाजीया तांबोळी, नंदा शिंदे, माया कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवफुलेशाहूआंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस आहे.यामुळेच विधानसभा निवडणुकीत १० टक्के मुस्लिम उमेदवारांना संधी दिली.मागील एका वर्षात अनेक निर्णय झाले. यात राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून मार्टी ची स्थापना केली आहे.संभाजी नगर येथे अल्पसंख्यांक आयुक्तालय उभारले आहे.अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरीता ५ लाखावरुन ३० लाख शिष्यवृत्ती दिली आहे. वक्फ बोर्ड च्या कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी जागेचे प्रावधान करत आहे. मागील ३ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व मी मिळून कळवा मुंब्रा मतदासंघांच्या विकासासाठी २०० कोटीचा चा निधी दिला. १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा मी मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल, हा माझा वादा आहे, तसेच टोरन्ट मुक्त न ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखविन, हे माझे वचन आहे, घड्याळला मत म्हणजे राज्याच्या विकासाला मत असे सांगत मी वचन देतो ते पूर्ण करतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
0000