मुंबईच्या बदामीची पुण्याचे घोडकेवर मात

मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबईच्या हसन बदामीने सर्वोत्तम खेळ करताना  मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेमच्या ’15-रेड’ स्नूकरच्या राऊंड-रॉबिन सामन्यात पुण्याच्या अमरदीप घोडकेला 3-1 अशा फरकाने पराभूत केले.

मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत एफ गटात शनिवारी फॉर्मात असलेल्या बदामीने पहिली फ्रेम गमावूनही दमदार पुनरागमनासह 43-54, 63-45, 63-17 आणि 65-23  असा विजय मिळवला. त्यात दुसर्‍या आणि तिसर्‍या फ्रेममधील अनुक्रमे 40 आणि 58 गुणांचा ब्रेक महत्त्वपूर्ण ठरला.

दरम्यान, मुंबईचा स्टार क्यूईस्ट शाहयान राझमीने पुण्याच्या रोहित रावतचा 3-1 (64-26, 43-57, 55-41, आणि 67-37) असा पराभव करून तिसरा विजय मिळवताना ब गटात पहिले स्थान मिळवले. मुंबईचा आणखी एक खेळाडू अनुराग बागरीने युवा खेळाडू  समय वाधवनवर 3-1 (58-32, 36-62, 81-33, 48-21) अशी मात केली. राऊंड-रॉबिन फेरीत चारही सामने जिंकण्याची करामत साधताना क गटात पहिला नंबर पटकावला.

निकाल – 15-रेड स्नूकर राऊंड-रॉबिन लीग: कैझाद फिटर विजयी वि. जगदीश कुर्मी (नाशिक) 3-0 (56-45, 73(35)-1, 65-20;

विशाल बैस (नाशिक) विजयी वि. सिद्धार्थ टेंबे (पुणे) 3-0 (55-42, 45-34, 53-09) ;

सोनू मातंग (पुणे) विजयी वि. स्वप्नील पाटील (मराठवाडा) 3-1 (53-33, 77(50)-35, 46-75, 71-43;

अनुज अग्रवाल (ठाणे) विजयी वि. प्रशांत डुंभेरे (नागपूर) 3-2 (46-44, 52-18, 39-41, 44-49, 54-29);

आदित राजा विजयी वि. सुमेर मागो 3-2 (42-78, 75-5, 67-50, 47-54, 68-37);

सुनील जैन विजयी वि. चेतन राजरवाल (मराठवाडा) 3-0 (67-29, 73-17, 80-21);

आरव संचेती (पुणे) विजयी वि. आकाश रामटेके 3-1 (56-42, 8-55, 65-29, 65-31);

गौरव देशमुख (पुणे) विजयी वि. अंशुल तांडेकर (नागपूर) 3-0 (49-13, 92-47, 67-39).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *