मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाला सर्वाधिक पसंती मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिळाली असून येथे तबल ४९८ अर्ज आले होते. या अर्जांपैकी गुरुवारपर्यंत २३६ मतदारांची गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

यासंदर्भात स्थानिक आमदार आणि मुलुंडचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा म्हणाले की, दिलेल्या कालावधीत उपनगरामध्ये सर्वाधिक गृहमतदानाचे नोंदणी माझ्या मलुंड या मतदारसंघातून झाली आहे. आमच्या भाजपच्या चमूचे हे सर्वस्वी यश आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमतदानासंबंधी येथील ज्येष्ठ मतदारांमध्ये जागृती केली होती, त्याचा हा परिणाम आहे, असे कोटेचा म्हणाले.

गुरुवारपर्यंत मुलुंडमध्ये २३६ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी गृह मतदान प्रक्रिया पूर्ण केली होती. गृहमतदानाचा कालावधी १३ ते १६ नोव्हेंबर, २०२४ असा आहे. मुलुंडमधील ४९८ गृहमतदारांमध्ये ४७४ ज्येष्ठ मतदार असून २४ दिव्यांग मतदार आहेत.

मुलुंडनंतर दुसऱ्या करमांची गृह मतदानाची नोंदणी वांद्रे (पश्चिम) मतदारसंघात झाली असून ती ४९५ आहे. उपगरांमध्ये एकुण ४३४९ नागरिकांनी गृहमतदानाची नोंदणी गेली होती. गुरुवापरपर्यंत ३५३३ गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक, दिव्यांग मतदार कोविड संसर्ग रुग्ण आणि अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना गृह मतदानाचा लाभ घेता येतो.

मुलुंडने गृह मतदानासाठीच्या नोंदणीत अव्वल स्थान प्राप्त केले आहेच. गृहमतदानाच्या संख्येतही मुलुंड मतदारसंघ उपनगर जिल्ह्यात अव्वल राहील, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मुलुंडचे आमदार व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी‘ रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *