अनिल ठाणेकर

ठाणे : शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विकासकार्याचा डोंगर मतदारसंघात उभा केला आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात  आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन, मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत उबाठा गटाचे, काँग्रेस व इतर अनेक पक्षाचे पदाधिकारी, शेकडो कायकर्ते यांनी गेल्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत झाली आहे.

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कामगिरीवर विश्वास ठेऊन वाघबीळ येथील उबाठा गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून पाठिंबा दर्शविला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यावर असलेला विश्वास दाखवून शिवसेना पक्षात  पक्षप्रवेश होत असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची ताकद अजून बळकट होत आहे, याचा मला आनंद आहे असे  प्रताप सरनाईक म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक संजय तांडेल, ओवळा-माजिवडा विधानसभा समनव्यक साजन कासार, विभागप्रमुख रवी घरत, शिवसैनिक मंगेश शिंगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *