अनिल ठाणेकर
ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे. वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुराणी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करूनडॉ..जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे.
१५ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा हा परिसर अविकसित होता. सन 2009 मध्येडॉ..जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी, वीज या सर्व समस्या मार्गी लागलेल्या असल्यानेच सोसायटीनेडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पूर्ण समर्थन दिले असल्याचे आमीर आणि ग्लोबल पार्क सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान, या सोसायट्यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे इतर कोणत्याही उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या सोसायटीत येऊ नये, यासाठी या दोन्ही सोसायट्यांनी प्रवेशद्वारावरच “हमारे सम्मानित नेताडॉ..जितेंद्र आव्हाड साहेब को हमारा पूर्ण समर्थन और शुभकामनाएं ” असा संदेश लिहिलेला फलक लावले आहेत.