एमआयजी सीसीला जेतेपद; जठार, जैस्वाल चमकले

मुंबई:गौरव जठारचे (55 धावा) दमदार अर्धशतक आणि अंकुश जैस्वालच्या (5/11) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचा (केएसए) चार विकेट राखून पराभव करताना एमआयजी क्रिकेट क्लबने एमसीए प्रेसिडेंट चषक ए आणि बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले.

बीकेसी येथील एमसीए स्टेडियम खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रविवारी कर्नाटक एसएने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तरी आघाडी फळीने निराशा केली. मात्र, मधल्या फळीतील ऐश्वर्य सुर्वेने 47, अजिंक्य पाटीलने 31 आणि वैभव माळीने 27 धावांची भर घातल्याने त्यांनी 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या. अंकुशने 11 धावांत निम्मा संघ गारद केला. त्याला हर्ष तन्नाची (2/33) चांगली साथ लाभली.

एमआयजी क्रिकेट क्लबने 19.1 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले. गौरवने 55 धावा करताना त्यात मोलाचे योगदान दिले. अथर्व अंकोलेकरने नाबाद 29 आणि ओम केशकामतने 25 धावा काढताना विजयाला हातभार लावला. कर्नाटक एसएकडून भव्य अत्रेने 2 विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक – एमसीए प्रेसिडेंट चषक: कर्नाटक एसए – 20 षटकांत 9 बाद 147 (ऐश्वर्य सुर्वे 47, अजिंक्य पाटील 31, वैभव माळी 27; अंकुश जैस्वाल 5/11, हर्ष तन्ना 2/33)पराभूत वि. एमआयजी क्रिकेट क्लब – 19 षटकांत 6 बाद 152(गौरव जठार 55, अथर्व अंकोलेकर 29*, ओम केशकामत 25, भव्य अत्रे 2/40). निकाल – एमआयजी क्रिकेट क्लब चार विकेट राखून विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *