मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा

मुंबई : पुण्याच्या गौरव देशमुख आणि  आरव संचेती यांनी लीग सामने जिंकताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली. मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत आय गटात गौरवने बेस्ट ऑफ फाइव्ह फ्रेम ’15-रेड’ स्नूकर राऊंड-रॉबिन सामन्यात मुंबईच्या आकाश रामटेकेचा 3-0 (68-38, 96-78, 58-32) असा पराभव केला. बाजूच्या टेबलवर, संचेतीनेही दमदार खेळ करताना नागपूरच्या अंशुल तांडेकरला 3-0 (71(30)-24, 62-45, 58 9) असे हरवले. गौरवने तीन विजयांसह गटात अव्वल स्थान राखले. संचेतीला दुसरे स्थान मिळाले.

दरम्यान, मुंबईचा अनुभवी क्यूईस्ट चेराग रामकृष्णनने आपला पूर्वीच्या फॉर्मची झलक दाखवत मराठवाड्याच्या चेतन राजरवालला 3-0 (60-51, 78-21, 66-26) अशा फरकाने पराभूत केले.

नागपूरच्या जुबेर शेखने मुंबईच्या सुनील जैनवर 3-1 (58-26, 59-51, 34-74, 69 (48 14) अशी मात केली. के गटात.झुबेर आणि चेरागने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

पुण्याचा अभिजीत रानडेने सर्वोत्तम फॉर्म कायम राखत अभिषेक बजाजवर 3-0 (75(44)-51, 62-36, 71-29) असा विजय मिळवला. अभिषेक बजाजवर 3-0 (75(44)-51, 62-36, 71 29) असा पराभव केला. रानडे आणि बजाज या दोघांनीही आय ग्रुपमध्ये अव्वल दोन क्रमांकांसह आगेकूच केली.

निकाल – 15-रेड स्नूकर राऊंड-रॉबिन लीग फेरी: गौरव देशमुख (पुणे) विजयी वि. आकाश रामटेके 3-0 (68-38, 96-78, 58-32);

आरव संचेती (पुणे) विजयी वि. अंशुल तांडेकर (नागपूर) 3-0 (71(30)-24, 62-45, 58-9 ;

चेराग रामकृष्णन विजयी वि. चेतन राजरवाल (मराठवाडा) 3-0 (60-51, 78-21, 66-26);

झुबेर शेख (नागपूर) विजयी वि.  सुनील जैन  3-1 (58-26, 59-51, 34-74, 69 (48)-14);

सुमेर मागो विजयी वि. ऋषभ जैन 3-0 (57-49, 76-32, 49-5);

अभिजीत रानडे (पुणे) विजयी वि. अभिषेक बजाज 3-0 (75(44)-51, 62-36, 71-29;

रोहित रावत (पुणे) विजयी वि. कृष्णा तोहगावकर (ठाणे) 3-2 (9-59, 60-52, 48-32, 39-63, 64-44);

आदित्य शांडिल्य विजयी वि. अनंत मेहता 3-1 (83-17, 62-49, 54-61, 74-42).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *