उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मीरा-भाईंदर : मिरा भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे पहायला मिळत आहे. या विकासाच्या वाटचालीत माझ्याकडे सातत्याने विकास कामांची मागणी आणि पाठपुरा करणारे नरेंद्र मेहता हे एकमात्र आहेत,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .
मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपच्या नरेंद्र मेहतांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ नागरिकांना आवाहन करण्यासाठी फडणवीस यांनी एक समाज माध्यमांवर व्हिडिओ जारी केला आहे. यात पुढे ते म्हणाले की मेहता महापौर पदापासून ते आमदार होईपर्यंत सातत्याने जनतेत राहिले. जनतेचे प्रश्न सोडवले, मिरा-भाईंदर चे प्रश्न सोडवले, रस्ते विकसित करण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी मिरा-भाईंदरकरांसाठी मोठा विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे, असे ही ते म्हणाले.
नरेंद्र मेहता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुती मधील शिवसेना ,भाजप आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस,पिरिपा , लहुजी शक्ती सेना अशा सर्वांचा पाठिंबा नरेंद्र मेहतांना आहे. मी स्वतः, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही सर्वजण मेहतांच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे मिरा भाईंदरकरांनी पुन्हा एकदा नरेंद्र मेहतांना आशीर्वाद द्यावा. मेहतांच्या माध्यमातून सुरू झालेली विकास कामांची मालिका पूर्ण करून आम्ही मिरा-भाईंदर ला सुंदर शहर तयार करून दाखवू.