मिरा भाईन्दर : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार मध्यवर्ती गुन्हे कक्षाने आर्यन या इसमाला ५०० रुपयाच्या बनावट नोटा घेवून जाताना डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ड व प्रेझेन्ट पार्क रोडकडे जाणारे रस्त्यावर, मिरारोड पुर्व येथे सापळा लावून अटक केली.
या आरोपीला नाव पत्ता विचारून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगमध्ये वेगवेगल्या नंबरच्या भारतीय चलनाच्या ५०० रुपये दराच्या १०,३५२ नोटा मिळल्या. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आर्यन मनसुखभाई जाबुचा हा भावनगर, गुजरातचा राहणारा असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.
