जीसीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससीला विजेतेपद
मुंबई : सीजीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससी, मुंबई संघाने एमसीए कार्पोरेट ट्रॉफी बी डिव्हिजन 2024-2025 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी एमसीए क्रिकेट ग्राउंड, बीकेसी येथे खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रविवारी त्यांनी ऑटोमोटिव्ह सीसीवर 6 विकेटनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ऑटोमोटिव्ह सीसीने 20 षटकांत 8 बाद 102 धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल केसरीने (44 धावा) सर्वाधिक धावा केल्या. सीजीएसटीकडून दीपक शेट्टी (9 धावांत 3 विकेट) आणि यश चव्हाणने (25 धावांत 2 विकेट) अचूक मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना कमीतकमी धावांमध्ये रोखले.
प्रत्युत्तरादाखल, सीजीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससीने विजयी लक्ष्य 14.2 षटकांत चार विकेटच्या बदल्यात पार केले. श्रीराज घरतने 36 आणि तुषार श्रीवास्तवने 33 धावा केल्याने त्यांनी 5.4 षटके आणि 6 विकेट राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : ऑटोमोटिव्ह सीसी – 20 षटकांत 8 बाद 102(राहुल केसरी 44; दीपक शेट्टी 3/9, यश चव्हाण 2/25) वि. जीसीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससी – 14.2 षटकांत 4 बाद 106(श्रीराज घरत 36 , तुषार श्रीवास्तव 33). निकाल – सीजीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससी सहा विकेट राखून विजयी.