शेवटच्या रॅलीत हजारो अबालवृद्धांचा जोशपूर्ण सहभाग

अनिल ठाणेकर

ठाणे : महाविकास आघाडीचे  अधिकृत उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचाराचा समारोप  सोमवारी प्रचंड गर्दीच्या रॅलीने मुंब्र्यात केला . या शेवटच्या भव्य प्रचार रॅलीत हजारो नागरिक , महिला आणि अबालवृद्ध सहभागी झाले होते . मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शन  दरम्यानच्या रोड शोमुळे सबंध मुंब्रा – कौसा शहर “तुतारीमय”  झाले. लाखो लोक डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ एकवटलेले पहावयास मिळाले.

या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही रॅली ज्या ज्या रस्त्यावरून  जात होती. त्या भागात नागरिकांकडून डॉ.  आव्हाड यांचे जोरदार स्वागत केले जात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ठिकठिकाणी  डॉ. जितेंद्र आव्हाड हे माईक हातात घेऊन आपले निवडणूक चिन्ह सांगत होते त्यावेळी नागरिक त्यांना उस्फुर्त प्रतिसाद देत होते भर उन्हात ही रॅली सुरू झाली होती. तरीही, विविध स्तरातील नागरिक, तरूण, वृद्ध, महिला या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मोठी रॅली काढण्यात आली. तुतारीचा निनाद आणि ढोल – ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली.प्रचाराच्या शेवटच्या रॅलीत मुंब्रा परिसरातील नागरिक , महिला , अबालवृद्ध मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने कळवा मुंब्रा परिसर तुतारीमय मे झाला असून विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची चर्चा उघडपणे नागरिक करताना दिसत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *