माथेरान : माथेरान मधून सहा अल्पवयीन युवक साजगाव यात्रेसाठी खोपोली येथे गेले होते. यात्रेवरून परत येत असताना महड जवळ उभ्या असलेल्या टेम्पोला यातील एका स्कुटीने जोरदार धडक दिली. यामध्ये माथेरान मधील अजय आखाडे, दर्शन वेताळ, प्रथमेश सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र पहाटे अजय आखाडे आणि दर्शन वेताळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यामध्ये प्रथमेश सोनवणे यांची प्रकृती गंभीर आहे.अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यामुळे माथेरानवर शोककळा पसरली.सकाळपासून ते अंत्ययात्रा निघेपर्यंत व्यापारी वर्गाने सर्व दुकाने बंद ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *