भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावेळी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, दत्ता काळे, सुचिता गीध, एनयूएचएम शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.श्रीदेवी गर्गेलवार आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.