उरण : उरण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा दावा शेकापच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.
20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पडणार आहे. त्यांच्या प्रचाराला, रॅलीला सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विकासाचे काम करणारे दमदार आमदार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने पाहिले जाते. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम जे म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले. ते उमेदवार म्हणून नव्हे तर गेली काही वर्षे या परिसरात सामाजिक काम करत असल्याने त्यांचा विजय नक्की असल्याचे गिरीश माळी यांनी सांगितले. धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम जे एम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज जोरदार होईल आणि प्रीतम म्हात्रे प्रचंड मतांनी निवडून येतील असे जेष्ठ कार्यकर्ते तरुण वर्ग सांगत आहे. यानिमित्ताने शेकाप आपला बालेकिल्ला राखेल असे बोलले जात आहे. शांत, शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावाचा सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रीतम दादा म्हात्रे यांची छबी निर्माण होत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. 20 नोव्हेंबर रोजी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या असे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे.
उरण विधानसभेचा आमदार गरिबांची जाण असलेला, संकटात धावून येणारा प्रीतम जे एम म्हात्रे असावा
उरण : उरण विधानसभेचा आमदार गरिबांची जाण असलेला आणि येथील नागरिकांच्या संकटात धावून येणारा प्रीतम जे एम म्हात्रे असावा असे नागरिक, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला वर्ग बोलत आहेत.
उरण विधानसभेला शांत, संयमी गरिबांची जाण असलेला आणि सुख दुःखात वेळेवर धावून येणारा आमदार जनतेला हवा आहे. येथील उरणचा विकास व्हावा यासाठी प्रीतम जे एम म्हात्रे प्रयत्न करत आहेत. येथील आमदारांनी विकास शून्य केला असून उरणचा विकास व्हावा असे प्रीतम जे एम म्हात्रे यांना वाटत आहे. अनेक संकट काळात त्यांनी नागरिकांना मदत केली आहे. महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा दिला. चौक, नढाळ येथील पंचायतन मंदिरा मार्फत अनेक गरजू नागरिकांना यापूर्वी विविध वस्तूंचे वाटप केले आहे. समाजसेवेत अग्रेसर असणारे प्रीतम जयम म्हात्रे यांना 20 तारखेला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
000
