सिंधुदुर्ग : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली च्या (एन.एल.एस.ए.) कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नेमणूक केली असून त्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. न्या. गवई यांचे नामनिर्देशन ११ नोव्हेंबरपासून प्रभावी असेल, असे न्याय विभागाने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
भारताचे सरन्यायाधीश हे एन.एल.एस.ए. चे (NALSA) प्रमुख संरक्षक असतात तर त्यानंतर ज्येष्ठ न्यायमूर्ती हे कार्यकारी अध्यक्ष असतात. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या निवृत्तीनंतर न्या. संजीव खन्ना सरन्यायाधीश झाले आहेत. यांच्यानंतर न्या. भूषण गवई हे सर्वांत ज्येष्‍ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. संजीव खन्ना यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने नियमानुसार हे पद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्तीकडे सोपवणे गरजेचे होते. त्यानुसार न्या. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती असल्याने त्यांची त्या पदावर नेमणूक करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नेमणुक केली असून विधी व न्याय मंत्रालयाने याबाबत अधिसुचना प्रसिध्द केली आहे. या नेमणुकीपूर्वी न्या. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *