ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजाचे प्रश्न मर्गिस लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल तरी समाजाच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो घराचा प्रश्न असो किंवा बुद्धविहार बांधण्याचा, कायमचं आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर;वाल्मिकी समाज बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दलित पँथरने दिला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपखाडी मतदार संघात रहाणाऱ्या वाल्मिकी समाजावर गेल्या काही वर्षांपासून अन्याय होतो आहे. मात्र अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रात राहून देखील वाल्मिकी समाजाच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कन्हैया नगर येथे ३० ते ३५ वर्षांपासून वाल्मिकी समाजाची ४५ पक्की घर होती. पालिकेने त्याच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प बांधणार असल्याचे सांगून घर खाली करायला लावली. मात्र अजून देखील कोणालाच घर मिळालेली नाही. या ठिकाणी रहाणारे सर्वजण पालिकेच्या घनकचरा विभागात कॉन्ट्रॅक्टर कडे काम करणारी आहेत. गेल्या १२ वर्षांपासून आपल्याला पक्क घर मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु घराचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत घराचा प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असेल तरी घर दिले नसल्याचा थेट आरोप दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी दिला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून कोपरी सिद्धार्थ नगर येथे बुद्धविहारचे काम देखील अर्धवट अवस्थेत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाल्मिकी आणि बुद्ध समाजाने भरभरून मतदान केलं आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी समाजाच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केलं आहे. समाजाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचा निषेध व्यक्त करून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे एकमताने मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे दलित पँथरने स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी
अशोक बनसोडे महाराष्ट्र सचिव
विमल सरनागत, नितीन मती राव ठाणे शहर युवक सचिव जयेश बनसोडे ठाणे शहर अध्यक्ष श्री शाळा वाटचाल शुभम कांबळे वागळे विभाग युवक अध्यक्ष आदित्य जाधव कोपरी विभाग अध्यक्ष विक्रम माने कोपरी विधानसभा उपाध्यक्ष यश वालज राजेश लोखंडे राजू पठाणे इत्यादी कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.
