पैसे आणि दारू वाटपाचा आरोप
ठाणे : शिवसेना उबाठा गटाचे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह 7 जणांवर ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात काल रात्री 2 वाजता कोपरी पोलिसांना एक गाडी संशयास्पदरित्या आढळली. या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना विविध प्रकारच्या परदेशी मद्याच्या 6 बाटल्या आणि 2 हजार रुपयांची 26 पाकिटात ठेवलेले 52 हजार रुपयांची रक्कम आढळली. सदर रक्कम ही मतदारांना प्रभावित करण्यासाठी आणल्याने कोपरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेऊन त्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी केदार दिघे, सचिन गोरीवाले, प्रदीप शेंडगे, रवींद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला असून सहा बाटल्या मद्य आणि एकूण 52 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
