– एमसीए महिला क्रिकेट लीग 2024
मुंबई : मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत सीसीने तिसऱ्या एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस सीसीविरुद्ध 97 धावांनी विजय मिळवला.
न्यू हिंद मैदान, माटुंगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मंगळवारी केतकी हिने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना 116 चेंडूमध्ये 22 चौकार आणि 4 षटकारांसह झंझावाती दीड शतकी खेळी केली. तिच्या फटकेबाज शतकी खेळीमुळे भारत सीसीने डाव 40 षटकांत 6 बाद 261 धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात ग्लोरियस सीसीचा डाव 40 षटकांत 8 बाद 164 धावांवर संपला. साध्वी संजय (७७ धावा) आणि वैष्णवी वर्मा (४८ धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारत सीसीकडून कशिश निर्मल ३७ धावांत २ आणि निर्वाण राणे २६ धावांत २ विकेट घेत मोठा विजय आणखी सुकर केला.
डॉ. डी. वाय. पाटील एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लबला १३७ धावांनी पराभूत केले. स्वरा खेडेकरची नाबाद शतकी खेळी (115 चेंडू, 12 चौकार) तसेच लावण्या शेट्टी (8 धावांत 3 विकेट), वर्षा नागरे (28 धावांत 3 विकेट), प्रिया मेहताने आणि मेगन रॉड्रिग्जची (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
प्रथम फलंदाजी करताना डी.वाय. पाटीलने 40 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी केआरपी इलेव्हन सीसीला 24.3 षटकांत अवघ्या 80 धावांत गुंडाळले.
एका अन्य सामन्यात, भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या जान्हवी काटेने (धावा 110, 103 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार) आणखी एक शतक झळकावून एकतर्फी सामन्यात फोर्ट यंगस्टर्स सीसीला व्हिक्ट्री सीसीविरुद्ध 83 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक: भारत सीसी – 40 षटकात 6 बाद 261 (केतकी धुरे 158* (116 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार), लक्ष्मी सरोज 37; दिशा चांडक 2/24, वैष्णवी वर्मा 2/38) वि. ग्लोरियस सीसी – ४० षटकांत ८ बाद १६४(साध्वी संजय ७७, वैष्णवी वर्मा ४८; कशिश निर्मल २/३७, निर्वाण राणे २/२६). निकाल – भारत सीसी ९७ धावांनी विजयी.
डॉ. डी. वाय. पाटील एसए – 40 षटकांत 5 बाद 217 (स्वरा खेडेकर 100* (115 चेंडू, 12 चौकार); चेतना कांबळे 2/31) वि. केआरपी इलेव्हन सीसी – 24.3 षटकांत सर्वबाद 80(तनिषा शर्मा 42; लावण्या शेट्टी 3/8), वर्षा नागरे 3/28, प्रिया मेहता 2/2, मेगन रॉड्रिग्ज 2/25). निकाल – डॉ. डी. वाय. पाटील एसए 137 धावांनी विजयी.
एमआयजी क्रिकेट क्लब – 40 षटकांत 8 बाद 211 (महेक मिस्त्री 84, मिताली म्हात्रे 39, रिया दोशी 29; तृषा परमार 3/41) वि. माटुंगा जिमखाना 9, 40 षटकांत 157(तृषा परमार 44, महेक पटेल 32; आर्या सुकाळे 3/28). निकाल – एमआयजी क्रिकेट क्लब 54 धावांनी विजयी.
बोरिवली एससी – 27.5 षटकांत सर्वबाद 58(विदिका पाटील 3/11, पर्ल कोरिया 3/13, श्रावणी पाटील 2/3) वि. साईनाथ एससी – 9.3 षटकांत 2 बाद 59(निधी घरत 28*). निकाल – साईनाथ एससी आठ विकेट राखून विजयी.
भिवंडी तालुका सीए – 38 षटकांत 7 बाद 273(अवनी खंडागळे 52, प्रांजल मळेकर 41; गौरी झेंडे 3/55) वि. नॅशनल सीसी – 40 षटकांत 6 बाद 173 (जागृती भोई 76, सुनीत्रा ठाकूर 42). निकाल – भिवंडी तालुका सीए १०० धावांनी विजयी.
फोर्ट यंगस्टर्स – 40 षटकांत 5 बाद 214 (जान्हवी काटे 110 (103 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार); नियती जगताप 3/31) वि. व्हिक्टरी सीसी – 32.4 षटकांत सर्वबाद 131(महेक पोकर 38; हिमजा पाटील 2/4). निकाल – फोर्ट यंगस्टर्स 38 धावांनी विजयी.
0000