सर्वसामान्य माणसाला महागाईचा नवा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थ आणि वस्तू (उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल, शाम्पू अशा सर्वच) महागण्याची शक्यता आहे.
जुलै- सप्टेंबर तिमाहीमध्ये ‌‘हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशन‌’च्या कारणाने ‌‘एफएमसीजी‌’ कंपन्यांचे मार्जिन कमी झाले. त्याचा परिणाम शहरी क्षेत्रातील विक्रीवर दिसत आहे. त्यामुळे या कंपन्या आता आपली उत्पादने महागात विकू शकतात. काही कंपन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‌‘हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड‌’पासून गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेट, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये शहरांमध्ये घटलेल्या पदार्थांच्या विक्रीची चिंता सतावत आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये शहरी क्षेत्रात अंदाजापेक्षा कमी विक्री झाली आहे. तज्ज्ञांच्या मते ‌‘एफएमसीजी‌’ सेक्टरच्या एकूण विक्रीमध्ये शहरातील विक्रीचा हिस्सा 65-68 टक्के असतो. सप्टेंबर तिमाहीदरम्यान शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली विक्री झाली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये झालेला हा तोटा एक शॉर्ट टर्म झटका आहे. त्यामुळे खर्च स्थिर करून मार्जिन वसुल केले जाईल, असे ‌‘जीसीपीएल‌’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‌‘सीईओ‌’ सुधीर सीतापती यांनी म्हटले आहे. या काळात खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि शहरी भागात मागणीत झालेली घट हीदेखील या घसरणीची कारणे मानली जात आहेत.
शहरी क्षेत्रात ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर प्रभाव झाल्याचे ‌‘टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड‌’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसुझा यांनी म्हटलेले आहे. या तिमाहीमध्ये मार्केट व्हॉल्युम ग्रोथ सुस्त राहिली आहे. अलीकडच्या तिमाहीमध्ये शहरातील वाढ प्रभावित झाली आहे, तर ग्रामीण क्षेत्रात हळूवार का होईना, वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *