मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही प्रतिक्रिया दिली.

मीडियातून या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. यासंदर्भात योग्य चौकशी व्हायला हवी, असे माझे स्पष्ट मत आहे. या प्रकरणात नेमके काय खरे आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. कारण या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे

बिटकॉइन स्कॅमप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आवाज सुप्रिया सुळेंसारखा असल्याचे वाटत आहे. आपण म्हणू शकतो की आवाज सुप्रिया सुळेंचा आहे. पण निष्पक्षतेसाठी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन जाऊद्या. जर कोणी आवाजात छेडछाड केली असेल, तर एआयच्या मदतीने त्याला उलगडा केला जाऊ शकतो. हे बिटकॉइन शेकडो कोटी रुपयांचे आहेत. हे प्रकरण निवडणुकीसंबंधीचे असल्याचे मानता येत नाही, हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *