मुंबई : बॉम्बे जिमखान्याच्या बीजी केअर्स (BG Cares) या सीएसआर उपक्रमातर्गत जिमखाना मैदानावर २१ आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन श्रेणींमध्ये प्रत्येकी २० खेळाडू निवडले जाणार आहेत. इच्छुकांनी चाचणीसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता बॉम्बे जिमखाना मैदानावर पांढरा क्रिकेट गणवेश आणि शूजमध्ये उपस्थित राहावे. याशिवाय आपल्यासोबत जन्म दाखला आणि आधार कार्डची प्रत सोबत ठेवावी.
01.09.2005 रोजी किंवा नंतर आणि 31.08.2008 पूर्वी जन्मलेले १९ वर्षांखालील निवडचाचणी पात्र ठरतील. २३ वर्षाखालील निवड चाचणीसाठी सदर खेळाडू हा ०१.०९.२००१ रोजी किंवा त्यानंतर ३१.०८.२००५ पूर्वी जन्मलेला असावा. या दोन वयोगटासाठी एमसीएच्या अन्य क्लबसाठी नोंदणी केलेले खेळाडू निवडचाचणीसाठी पात्र नाहीत.
बॉम्बे जिमखान्यातर्फे निवड झालेल्या 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील मुलांचे वार्षिक मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या कोचिंग कॅम्पला अंबा श्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.
26 नोव्हेंबर 2024 ते 31 मे 2025 या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून सहभागींना अनुभवी प्रशिक्षक फरहाद दारूवाला यांचे मार्गदर्शन लाभेल.
दारुवाला हे जागतिक क्रिकेट अकॅडमी आणि झुबिन भरुचा यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल चाचणी शिबिरांचे माजी सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्याने 2019 मध्ये कॅनडा राष्ट्रीय संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले. सदर प्रशिक्षण शिबीर मंगळवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे.
0000