शासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांचेही आमच्याकडे दुर्लक्ष

भिवंडी : भिवंडी शहरा व ग्रामीण भागात सर्वत्र मतदान शांततेत पार पडत असून  शहरातील दांडेकर विद्यालय येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात एकूण 179 तृतीयपंथी मतदार नोंदवण्यात आले असून त्यापैकी 119 तृतीयपंथीयांनी मतदान केलं आहे.

तृतीय पंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.मात्र आजपर्यंत शासकीय यंत्रणेतील अधिकारी आमच्या घरापर्यंत पोहोचले नसून आम्हाला ओळखपत्र मिळाले नसल्याने अनेक तृतीयपंथीय मतदानापासून वंचित राहिले आहेत.विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील आपल्या घोषणा पत्रात तृतीयपंथी समाजाबाबत आश्वासक भूमिका कोणी मांडली नसल्या बद्दल ची खंत तृतीयपंथीय समाजासाठी काम करणाऱ्या ख्वाईश फाउंडेशनच्या तमन्ना मंसूरी यांनी बोलून दाखवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *