महाराष्ट्रात १० पैकी  एक्झिट पोल महायुतीच्याबाजूने , 3 मविआच्या बाजूने तर एकात कुणालाच बहुमत नाही

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तब्बल ६० टक्के मतदान झाले असून आता महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापुर्वीच महाराष्ट्रात एक्झिट पोलचा झोल पुन्हा जोरात सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या १० एक्झिट पोलमध्ये सहा जणांनी महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे तर तीन जणांनी महाविकास आघाडीचे सरकार येणार असे सांगितले आहे. एका एक्झिट पोलनुसार कुणालाच बहुमत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकार कुणाचे का येईना यंदाच्या या निवडणूकीत खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला जनतेच्या न्यायालयात होणार आहे. आणि या एक्झिट पोलमधिल आकडे खरे मानले तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या पक्षावरील दावा मजबूत केल्याचे चित्र आहे. अर्थात अंतिम फैसला २३ तारखेलाच कळेल. २५ नोव्हेंबर पर्यंत नवे सरकार स्थापन होण गरजेचे आहे. त्यामुळे जर कुणालाच बहुमत मिळाले नाही तर सत्ता स्थापनेच्या या खेळात राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू शकते…

असे आहेत एक्झिट पोल

इलेक्टोरल एज एक्झिट पोल
महायुती ११८
मविआ १५०

पोल डायरी एक्झिट पोल…
महायुती १२२-१८६
मविआ ६९- १२१

चाणक्यचा एक्झिट पोल
महायुती १५२-१६०
मविआ १३०-१३८

मॅट्रिझ एक्झिट पोल…
महायुती – १५०-१७०
मविआ – ११०-१३०

पी मार्क्यू एक्झिट पोल
महायुती – १३७-१५७
मविआ -१२६-१४६

रिपब्लिक एक्झिट पोल
महायुती – १३७-१५७
मविआ -१२६-१४६

SAS एक्झिट पोल
महायुती – 127-135
मविआ -147-155

पीपल्स पल्स एक्झिट पोल
महायुती 175-195
मविआ 85-112
इतर 07-12

भास्कर रिपोर्टर्स पोल
महायुती १२५-१४०
मविआ १३५- १५०
इतर २०-२५

लोकशाही महारुद्र
महायुती १२८-१४२
मविआ १२५-१४०
इतर १८-२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *