अनिल ठाणेकर

ठाणे : महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक  पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ओवळा माजिवडा विधानसभेचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत सकाळी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केल्यानंतर “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे.” असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी उपस्थित नागरिकांना केले. मतदानासाठी घरा बाहेर पडण्याचे देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले.सरनाईक यांनी मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. ठाण्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्येही मतदानासाठी उत्साह जाणवत आहे. शांततेत आणि सुरळीतरीत्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा मोठा सहभाग असल्याने या निवडणुकीचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *