कल्याण : यंदाच्या निवडणूकीत कल्याण पश्चिममध्ये ११.१७ टक्के मतदानाचा टक्का वाढला आहेत. या वाढलेल्या मतदानात मुस्लिम समाजसेवी संघटनांचा वाटा मोठा आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजात मतदानाची जनजागृती करण्यात या संस्थांनी मोठी भूमिका बजावली.
लोकसभेच्या निवडणूकीत यासाठी कल्याण – भिंवडी लोकसभा ग्रुप स्थापन करण्यात आला होता. त्यांनी जवळपास २३ हजाराहून अधिक नव मतदारांची नोंदणी यादरम्यान केली अशी माहिती कल्याणच्या इबाद शेमले यांनी दिली.
कल्याण पश्चिम मतदारसंघात यापूर्वीच्या दहा वर्षात ४१.९१ ते ४४.९६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील चार लाख ४० हजार मतदारांपैकी यंदा दोन लाख ४३ हजार मतदारांनी मतदान केले. यंदा या मतदारसंघात ५४.७५ म्हणजे ११.१७ टक्के वाढीव मतदान झाले. या वाढलेल्या मतदारांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बासरे यांना या वाढीव टक्क्याचा नक्की लाभ होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
फोटो ओळी तीन कॉलम
कल्याण भिवंडी लोकसभा ग्रुप संघटनेचे स्वयंसेवकांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव असा साजरा केला.
