149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघासाठी

ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रीय निवडणूक निर्वाचन आयोगाने 149 मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली आहे.

149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नागरिकांच्या मतमोजणीविषयी काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे 21 नोव्हेंबर 2024 पासून countingobserver149@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा कमलेश कुमार भादू (एस.सी.एस) यांचे संपर्क ठिकाण बी-34, तळमजला, रेमंड गेस्ट हाऊस, जे.के. ग्राम, ठाणे (पश्चिम), ठाणे, जिल्हा ठाणे या ठिकाणी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात, याची नोंद घ्यावी, असे आवाहन 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *