स्लग- मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अंदाज स्पर्धेत

महायुतीला १४० तर, मविआला १३८ जागा

मुंबई, :  मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासाठी अंदाज वर्तवा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील सरासरी अंदाजानुसार भाजपाप्रणीत महायुती ही १४० जागापर्यंत मजल मारू शकते,  तर मविआची झेपही १३८ जागापर्यंत पोहचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एकूणच या अंदाज स्पर्धेनुसार महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन अपक्षांची किंगमेकरची भूमिका राहील, असे चित्र आहे. राज्यात नंबर १ चा पक्ष हा भाजपा राहील आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा क्रमांक लागेल असा अंदाजही या स्पर्धेत वर्तवण्यात आला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक पसंती ही देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे तर तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंना पसंती देण्यात आली आहे,  अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

येत्या २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पत्रकारांना रोख रकमेची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक आत्माराम नाटेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *