अलिबागमध्ये सर्वाधिक 77. 15 टक्के मतदान
पनवेलमध्ये मतदान करण्यात महिला आघाडीवर
अलिबागः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क् बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत 2024 मध्ये 2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के तर सर्वात जास्त अलिबाग मतदारसंघात 77.15 टक्के मतदान झाले आहे. पनवेल मतदारसंघात मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे. पनवेल मतदारसंघात 59.28 टक्के पुरूषांनी तर 59.19 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरूवरी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपनिवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदरसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यापैकी 17 लाख 16 हजार 403 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 69.80 टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. 68. 12 टक्के महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पनवेल मतदारसंघांत मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. 58.28 टक्के पुरूष तर 59.19 टक्के महिलांनी मतदान केले.
पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के मतदान झाले. कर्जतमध्ये 74.29, परणमध्ये 76.80, पेणमध्ये 73.02 , अलिबागमध्ये 77.15, श्रीवर्धनमध्ये 61.37 तर महाडमध्ये 71.53 टक्के मतदान झाले.एकूण 69.04 टक्के मतदान झाले. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीपेक्ष यंदाच्या विधनसभा निवडणूकीत 2 टक्के मतदान वाढले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत 67.33 टक्के मतदान झाले होते. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत 10 टक्के मतदान वाढले आहे. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत 60.51 टक्के मतदान झाले होते.
बाहेरगावी असलेले मतदार मतदान करण्यसाठी मोठ्याप्रमाणावर आपल्या मुळगावी आल्यामुळे मुबई – गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतुककोंडी झाली होती. त्यामुळे मुबई गोवा महार्गावरील अजड वाहनांची वाहतु काहीकाळ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी महिती यावैळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
२३ नोव्हेबर रोजी सकाळी ८ वाजल्यापसून मतमोजणी करण्यात येणार आहे. ए. आर. कालसेकर पॉलीटक्नीक कॉलेज पनवेल, प्रशासकीय भवन कर्जत, दि. बा. पाटील मंगल कार्यालय जासई- उरण, के, ई, एस. लिटिल एंजल स्कूल , पेण, जिल्हा क्रीडासेकूल नेहूली अलिबाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी २ हजार ४५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८१ मतमोजणी पर्यवेक्षक, २०४ मतमोजणी सहाय्यक, १६५ मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, १८३ इतर पथकातील अधिकारी (वर्ग-२ ), ९८६ इतर पथकातील अधिकारी (वर्ग-३), ७३४ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी महिती किशन जावळे यांनी दिली.
सर्व मतमोजणी केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व मतदानकंद्रांवार त्रिस्तरीय बंदोबासत असेल. पहिल्या टप्प्यात निमलष्कारी दल, दुसर्या टप्प्यात राज्य राखीव पोलीस दल, तीसर्या टप्प्यात स्थानिक पोलीस दल आस बंदोबस्त असेल. सर्व टप्प्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या व्यतीक्ति सर्व मतमोजणी केंद्रावंर 100 पोलीस कर्मचारी व 10 पोलीस अधिकारी असा पोलीस बंदोस्त ठेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यावेळी दिली.
