अनिल ठाणेकर
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरळीत पार पडली असून जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी फरहान खान हॉल, मिल्लत नगर, ममता हॉस्पिटलच्या मागे, पहिला मजला भिवंडी येथे होणार आहे. शहापूर अ.ज. विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.शिवाजीराव जोंधळे कॉलेज, आसनगांव, ता.शहापूर येथे, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी वऱ्हाळदेवी मंगमाता भवन हॉल, कामतघर, भिवंडी येथे, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी स्व.संपदा सिताराम नाईक, मंगल भवन, पहिला मजला, भादवड, ता.भिवंडी येथे, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, तळमजला, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधारनगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, मुरबाड, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी विद्यालय व ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय, के.बी. रोड, अंबरनाथ प. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत, पवई चौक, हिराघाट, उल्हासनगर ३ येथे होणार आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महिला उद्योग केंद्र रॉयल रेजेन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ, विठ्ठलवाडी स्टेशन समोर, कल्याण येथे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आय.ई.एस चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टचे पाटकर विद्यालय, राजाजी रोड, डोंबिवली, पूर्व, ता.कल्याण येथे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तळमजला, के.डी.एम.सी ग्राऊंड, जलतरण तलाव बिल्डींग डोंबिवली पूर्व येथे, मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळमजला, स्व. प्रमोद महाजन हॉल, फेस ११, गोडदेव, भाईंदर, पूर्व येथे, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, पहिला मजला, आनंदनगर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे येथे, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाची मतमोजणी वर्कशॉप क्र १ आयटीआय, रोड क्र.२८, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे, ठाणे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, सी इमारत, रोडास सोसायटी जवळ हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, ठाणे येथे, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी श्री.मोलाना अबुल कलाम क्रिडा संकुल कौसा, मुंब्रा येथे, ऐरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती विद्यालय, सेक्टर ५ ऐरोली नवी मुंबई येथे तर बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आगरी कोळी सांस्कृतिक भवन, सेंक्टर २४ नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे.
००००
