अलिबागः शिवसेनेचे आमदार महेद्र दळवी अलिबाग विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजयी मिळवला. त्यांनी शेकाच्या चित्रलेखा पाटील यांचा 29 हजार 488 मतांनी पराभव केला. शेकापचा बालेकिल्ल समजल्या जाणारा अलिबाग विधानसभा मतदारसंघांत सलग दोन वेळा निवडून येण्याचा इतिहास आमदार महेंद्र दळवी यांनी केला. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार महेद्र दळवी , शेकापच्या चित्रलेख पाटील आणि अपक्ष दिलीप भोईर यांच्या तिरंग लढत झाली. यात आमदार महेंद्र दळवी यांना 1 लाख 12 हजार 841 मते मळाली. चित्रलेखा पाटील यांना 83 हजार 353 तर दिलीप भोईर यांना 32 हजार 936 मते मिळाली. महेंद्र दळवी यांना 29 हजार 488 मतांनी विजय मिळवला. अलिबाग विधासनसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला समजला जातो. 1952 पासून 10 वेळा येथून शेकापचे उमदवार विजीय झाले. शेकाप विरोधक 6 वेळा निवडून आले आहेत. द.का. कुंटे (1952) , साली द. कृ. खानविलकर ( 1962 ) , ना. का. भगत (1972) . मधूकर ठाकूर ( 2004) हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. हे चारही जण या मतदारसंघातून एकदाच निवडून आले.
अलिबाग मतदारसंघातून शेकापचे अॅड. दत्ता पाटील सहा वेळा विजयी झाले. त्यात सलग चार वेळा निवडून येण्याचा इतिहास त्यांनी घडवला आहे. शेकापच्या मीनाक्षी पाटील तीन वेळा विजयी झाल्या. त्या सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला होता. शेकापचे पंडित पाटील एकदा विजयी झाले. शेकाप वगळता इतर पक्षाचा उमेदवार अलिबाग मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आला नव्हता. ही परंपरा अमदार महेंद्र दळवी यांनी खंडित करून इतिहास घडवला. 2019 व 2024 असे सलग दोन वेळा महेंद्र दळवी निवडून आले आहेत. महेंद्र दळवी 2019 साली प्रथम अलिबाग विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तेव्हा ते अलिबाग विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले ते शिवसेनेचे पहिले आमदार ठरले होते. 2024 साली ते पुन्हा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
आमदार महेद्र दळवी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतील होती. ती त्यांनी कायम राखली. महेंद्र दळवी विजयी झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. फाटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.