मुंबई : महाराष्ट्राच्या जनेतेन माझे ५६ आमदार विधानसभेत पाठवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवून दिले. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“जनतेने आज दाखवून दिलं. असली नकलीमध्ये मी जाणार नाही. परंतु, बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचारधारेची शिवसेनेला लोकांनी कौल दिला. बोलणाऱ्यांना आम्ही कसं रोखणार. पण जनतेच्या कोर्टात जाऊन आम्ही त्यांना दाखवून दिलंय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जनतेला साष्टांग दंडवत घातला पाहिजे
“लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांनी एकंदरीत सर्वंच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे आभार. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी सांष्टांग दंडवत घातला पाहिजे, असं काम जनतेने केलेलं आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले.
