मुंबई : विधानसभेच्या या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होत असल्याचे म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. तसेच आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह भेदल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. गावागावात सगळीकडे जाऊन हा अलख जगवला हा विजय त्यांचा आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. मी अमित शाह यांचे देखील आभार मानतो. तसेच लाडक्या बहि‍णींचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. महाराष्ट्र मोदींजींच्या पाठीशी खंबीर उभा आहे. हे या निकालातून दिसले,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

असे यश आजवर पाहिले

नाही- अजित पवार

मुंबई : “मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. २२२ आणि २२५ असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार  यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे.

“आमच्यावर आता जबाबदारी वाढली आहे.  या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. जसेजसे आकडे मला समोर दिसत होते तसे अर्थखात्याचे आकडे मला दिसत होते. मी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितले की खूप काम करावं लागणार आहे. फार आर्थिक शिस्त आणावी लागणार असून आम्ही ती आणू. आम्हाला ते नवीन नाही. आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये महायुती जोरात चालली आहे. मराठवाड्यात आम्हाला झटका मिळाला होता. पण यावेळी तसं झालं नाही. काही मोजक्या जागा केल्या ते थोड्या मतांनी गेल्या आहेत,” असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *