मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. १२८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांचा स्ट्राईक रेट शुन्य राहीला. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेलाही पराभव पत्करावा लागला.
मनसेच्या प्रमुख उमेदवारांमध्ये अमित ठाकरे, विद्यमान आमदार राजू पाटील, तसेच बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांना पराभव पत्करावा लागला.
मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. त्यामुळे मनसे किंगमेकर होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु मनसेला जनतेने नाकारल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं, की महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला, त्यापेक्षा माझं दुःख कमी आहे.
