घरातून आपल्याला काही तरी आणायला सांगितलेले असते आणि आपण घरी परत आल्यानंतर त्याविधायी विचारले जाते तेव्हा आपण सहज ‘विसरलोच की’ असे म्हाणून जातो. नेमकी हीच गोष्ट शाळेत जाणारी मुले सुद्धा बोलून जातात. मग ते शाळेत असो की घरी. पण त्याबद्दल फारच महत्वाचे असल्याशिवाय अशा बाबी कुणी फारशा मनावर घेत नाही. एखादी गोष्ट विसरायला तुम्ही पुरुष असावे की महिला हा प्रश्न जसा येत नाही तसाच कोणताही माणूस आपल्या आयुष्याच्या कोणत्याही वर्षी निदान कधीतरी काहीतरी विसरू शकतोच.
विसरण्याचा संबंध मेंदूशी असल्यामुळे एका मेंदू तज्ञ चमूने याचा अभ्यास केला त्यांचे पहिले मत असे की एखाद्या रोगाचा संसर्ग झाला असेल किंवा काही पोषक तत्वांची शरीरात कमतरता असेल तर व्यक्तीच्या मेंदूत काहीसे धुके दाटल्यासारखे होते आणि काही गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. अनेकदा असेही होते की आपण कपाटापाशी जातो आणि आपल्याला तेथून काय हवे आहे हेच आपण विसरतो. चहाचा गरमागरम कप ठेवलेला असतो आणि काही वेळाने आपल्या लक्षात येते की चहा पिण्यासाठी आपण बसलो होतो हेच आपण विसरलो होतो. तुमचा मोबाईल तुम्हीच ‘म्यूट’ वर ठेवला असतो आणि विसरता. बराच वेळ कुणाचे फोन का येत नाहीत असे वाटते तेव्हा कळते.
मग आता हे सगळे विसरणे सामान्य आहे की ‘विसराळूपणा’ आहे की काही वेगळा विकार आहे आणि त्यावर उपचार करायला हवेत हे कसे समजणार? त्यासाठी काही लक्षणे सांगितली आहेत.
आपल्याला कोणत्याही कारणाने निराशा आले असेल तर विसरण्याच्या घटना होऊ शकतात हे त्यातले पहिले कारण आहे. मानसिक ताणाचे कारण असलेल्या कॉर्टिसॉल नावाच्या प्रथिनाचे प्रमाण वाढल्यामुळे स्मरणशक्ती काही प्रमाणात कमी झालेली असते. थकल्यासारखे वाटणे, शांत झोप न लागणे, वजन कमी किंवा अधिक होणे असी इतर काही करणेही असू शकतात. काही कारणाने आपले मन एकाग्र होऊ शकत नसेल तरीही व्यक्ती काही विसरू शकतो. त्यासाठी अगोदर मन शांत करण्यासाठी काही उपाय करावेत.
तज्ञांच्या मते कॉर्टिसॉलचे प्रमाण अनेक दिवस अधिक राहिले तर तुम्ही नवीन गोष्टी आठवणीत ठेऊ शकत नाही. स्मरणशक्ती कमी झालेली आहे असे स्वत:लाच वाटू लागते. यासाठी चांगली आणि सकारात्मक पुस्तके वाचणे अथवा नियमित मोकळ्या हवेत काही काळ फिरणे फायदेशीर असते.
विसरणे वाढले आहे असे दिसले तर सर्वात अगोदर योग्य प्रमाणात म्हाणजे किमान सात तास झोप मिळत नसेल. सकाळी अलार्म लावून नंतर एक दोनदा बंद केलात तरी त्यामधून स्मरणशक्तीला फायदा होतो असे मानले जाते. वय अधिक असेल तर केवळ पाच तास झोप योग्य नसते ती सात तास असायला हवी.
आपल्या मानेत असलेल्या थायरॉईड ग्रंथीचा शरीराच्या अनेक महत्वाच्या प्रक्रियांशी संबंध असतो. त्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता झाली असेल तरी स्मरणशक्तीवर काहीसा परिणाम होऊ शकतो. यात जीवनसत्त्व बी-१२ आणि लोह ही धातू फार महत्वाचे असतात.
आजच्या समाज जीवनात काही प्रमाणात विस्मरण हा काळाचाही परिणाम असू शकतो. किल्ली कुठे विसरली यापेक्षा आपण जी वस्तू आणायला निघालो ती वस्तू विसरायला होत असेल आणि हे वारंवार होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे.
प्रसन्न फीचर्स