ठाणे : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कळवा मुंब्रा मतदार संघातून विजयी झाले आहेत. सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. आव्हाड यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
कळवा मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील तीन टर्म या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले होते. तर नजीब मुल्ला, आनंद परांजपे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवली होती. परंतु नजीब मुल्ला यांचा सुमारे एक लाख मतांनी पराभव झाला आहे. नजीब मुल्ला यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात आव्हाड यांची मिरवणूक काढण्यात आली. आव्हाड हे या मतदारसंघातून आता चौथ्यांदा निवडून आले आहेत. आव्हाड यांचा विजय झाला असला तरी महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकली नसल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *