मुंबई : महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले तरी वानखेडेवर शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे.
२०१४ मध्ये आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअममध्ये शपथ सोहळा आयोजित केला होता. यावेळी भाजपाचे सुमारे ३५००० कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. असाच भव्यदिव्य सोहळा पुन्हा आयोजित करण्याच्या तयारीला भाजपा लागली आहे.
