शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने एकनाथ शिंदे यांची निवड केली. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदासोबतच सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेण्याचेही सर्वाधिकार यावेळी एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. तर मुंबईत आज अजित पवारा यांचीही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली.
