महाराष्ट्राने अनेक ऐतिहासिक निवडणुका बघितल्या आहेत, पण २०२४ ची वधानसभेची निवडणूक ही त्या सर्वांवर कडी करणारी हे. शरद पवार व उद्धव ठाकरेंचे नेतृत्व थिटे पडले आहे, काँग्रेसची सथिती देशोधडीला लागले अशी झालेली तर भाजपाचे राज्यातील शीर्शस्थ नेते देवेन्द्र फडणवीस हे स्वतेजाने उजळले आहेत.
अनेक विक्रमही या निकालाने घडवले आहेत. सलग तिसऱ्या विधानसभेत भाजपाचे शंभराहून अधिक आमदार दिसणार आहेत. हा विक्रम गेल्या चाळीस वर्षात झालेला नाही. १९८९ पूर्वी काँग्रेसने तसा पराक्रम केला. अलिकडे २०१४ नंतर भाजपाने त्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे.
तीव्र शब्दाचा मारा महाविकास आघाडीने महायुतीवर केलेला आपण या निवडणुकीत पाहिला. गद्दार, गद्दार, असे केवळ उद्धव ठाकरेच नव्हे, तर शरद पवारही सभांमध्ये किंचाळत होते. पण महायुतीच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य कऱणे, लाडकी बहीण योजनेचे गुणगान करणे यावर भर दिला.
धार्मिक धृवीकरणाचा मुद्दा निवडणुकीत आला. मस्लीम मौलवींनी थेट व्होट जिहादचे आवाहन व्हीडिओमधून केले ते व्हायरल झाले. रा.स्व.संघावर बंदीची जाहीर मागणी त्यांनी केली, जातीय दंगलीचे खटले काढून टाकण्याची मागणी केली. त्यांना मविआच्या नेत्यांनी रुकार दिला. त्याची प्रतिक्रिया ,एक है तो सेफ है, मध्ये उमटली. ,बटेंगे तो कटेंगे,चे नारे दिले गेले. आणि तब्बल सत्तर लाख अधिकचे मतदार हे मतदानात उतरले. ही मते लोकसभा निवडणुकीत पडलेली नव्हती. हा जागा झालेला मतदार पुढे आला. हे मतांचे धर्मयुद्धच लढवले गेले असे मानायला जागा आहे ती मौलवींच्या तत्संबंधीच्या उद्गारांमुळे.
इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या टोकाच्या तीव्र शब्द संहारा नंतर लागलेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने केवळ एकट्याच्या बळावर १३६ चा आकडा गाठला आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपने विधानसभेत शंभर आमदरा संख्या पार केली आहे हे तर झालेच, पण पूर्वीचा स्वतःचाच १२२ आमदार संख्येचा विक्रम मोडीत काढताना थेट १३६ चा आकडा भाजपाने गाठावा हे जवरच्या राज्यातील निकालात न घडलेले आक्रीत आहे. यातही या निकालाचे वेगळेपण आणि ऐतिहासिकपण सामावले आहे.
लाडक्या बहिणींनी आणले लाडकं सरकार, अशा शब्दातही या विजयाचे वर्णन करता येईल. महायुती सरकारची महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम टाकणारी योजना राज्य बुडवेल असा ओरडा करणाऱ्या मविआच्या नेत्यांनी त्या विरोधात न्यायालयातही धाव घेतली होती. पण तिथे हस्तक्षेपास नकार मिळाला. नंतर त्याच योजनेचे वाढीव स्वरुपाचे आश्वासन गँरेंटी रुपात देऊन काँग्रेसवाले, उबाठावाले व रा.काँ.श.प.वाले मोकळे झाले, हाही आश्चर्याचा भाग जनतेने पाहिला.
पण निकालात विरोधकांचा इतका सुपडासाफ व्हावा हे खरोखरीच आश्चर्यचकित करणारे आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी काल पर्यंत सरकार स्थापनेच्या व मुख्यमंत्री पदाबाबतच्या मोठमोठ्या वल्गना केल्या. पण त्यांना खरोखरीच निकालचा अंदाज आलाच नव्हता असे मानता येत नाही. पटोले म्हणाले होते की मी मुंबईला फडणवीसांसोबतच जाईन यातच निकालाचे भाकित होते काय ? !
एकाच निवडणुकीने देवेन्द्र फडणवीस यांचे नेतृत्व खणखणितपणाने सिद्ध केले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून प्रचंड यशस्वी ठरल्याचे सिद्ध केले आणि शरद पवारांचे आव्हान अजितददा पवार मोडीत काढू शकतात हेही या निवडणुकीने सिद्ध करून टाकले. खरी शिवसेना व खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, यावर आता पुढे चर्चाही कऱण्यात अर्थ नाही, असाच कौल जनतेने दिलेला आहे.
खरेतर शरद पवारांचे नेतृत्व हे माध्यमांनी जितक्या तावातावाने फुलवले व मोठे केले तितके ते खरोखरीच कधीच नव्हते. त्यांना कधीच मुख्यमंत्रीपदाची पूर्ण पाच वर्षांची टर्म पूर्ण करता आली नाही. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण प्रत्येक वेळी सव्वा वर्ष दीड वर्ष, सव्वा दोन वर्षे असाच कालावधी त्यांना गाठता आला. त्यांनी स्वबळावर काँग्रेसचे सरकार एकदाच १९९० मध्ये आणले. पण त्याही वेळी बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. शरदरावंनी काँग्रेसमधून दोन वेळा बाहेर पडून सवता सुभा स्थापन केला पण त्या पक्षाला कधीच ते पन्नासीच्या पुढे नेऊ शकले नाहीत. जेंव्हा अजित पवारांची साथ मिळाली, तेंव्हा २००० नंतर पवारांनी एकदाच ७१ ची आमदरासंख्या पहिली. पण २०१४ नंतर ती संख्या सतत घसरत राहिली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे ५४ आमदार विजयी झाले होते पण पावारंना ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला समर्थन देऊन स्वपक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले. साखर पट्टा व पश्चिम महाराष्ट्र हे पवारांचे बालेकिल्ले आहेत असे मानले जात होते. त्याला २०२४ च्या विधानसभेने त्या समजाला पूर्ण सुरुंग लावला आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा स्ट्राईक रेट फक्त दहा इतका आहे. तर साखरपट्ट्यात सारे मिळून पाच सहा आमदराही त्यांना निवडून आणता आले नाहीत. या निकालानंतर समाज माध्यमांत मिम्सचा पाऊस पडला आहे. त्यात पवार व उद्धव एकमेकांना मिठी मारून दोगेही गटांगळ्या खातात, शरद कमळ बघ अशा प्रकारची टिप्पणी आलेली आहे. शरद पवारांनी राजकाणातून आता निवृत्ती घ्यायला हवी हे त्यांचे अजितदादां सारखे सहकारी गेली काही वर्षे सांगत होते. तेच मतदारांनी आता प्रत्यक्षात मतदान यंत्राद्वारे शरदरावांना बजावले आहे. युगेन्द्र पवारांना उभे करून पवारांनी बारामतीत मोठी खेळी केली होती.
अजितला पाडा, दिलीप वळसेंना पाडा, असे ते मतदारांना त्रिवार बजावून सांगत होते. “पाडा, पाडा, पाडा…!” पण लोकांनी ते केले नाही अजितदादांनी लाखा पेक्षा अधिक मताधिक्य मिळवले. फडणवीस व एकनाथ शिंदे हेही दणदणित मतांनी विजयी झाले. पण शरद पवारांचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे पिछाडी आघाडी करत, करत, फक्त बारा हजारांनी निवडून आले.
काँग्रसेची अवस्था तर त्यापेक्षाही दुर्धर झाली आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. नाना पटोले हे फक्त दीडशे मताधिक्य घेऊन विजयी झाले. दारूणातील दारूण पराभव उद्धव ठाकरेंच्या नशिबात आला आहे. त्यांचे मुंबईतील व कोकणातीलही महत्व संपले आहे. त्यांनीही आपण आता झालोच मुख्यमंत्री अशा थाटात भाषणे केली. संजय राऊत यांच्या अतिबडबडीमुले व पोकळ वल्गांनामुळे हा पराभव झाला काय, याचेही आत्मपरीक्षण आता शिवेसनेला करावे लागणार आहे.