जव्हार : तालुक्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यापासून येथील नागरिक गुजराण करत असतात. मात्र, अचानक वणवे लागून जंगले नष्ट होत असल्याने वनसंपत्ती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वणवे या विषयावर जव्हार वन विभागामार्फत एक मोहीम राबवून जनजागृती करण्याची मागणी केली जात आहे.
दरवर्षी जव्हारच्या डोंगर व जंगलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, वेलवर्गीय वनस्पती उगवत असतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान या उगवलेल्या गवत व इतर वनस्पती वाळू लागतात. यादरम्यान डोंगर, जंगलातील मोठ्या झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडलेला असतो. याच वाळलेले गवत व इतर वनस्पती; तसेच पालापाचोळ्याला अनेकदा वणवे लावण्याचे प्रकार काहींकडून लावले जातात. अनेकदा गैरसमजुतीनेही वणवे लावले जातात. या वणव्यामध्ये अनेकदा संपूर्ण डोंगरच्या डोंगर, जंगले जळून खाक होऊन निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. यात वनसंपदा नष्ट होतात. अनेकदा पशू-पक्षी, वन्यप्राणी होरपळून निघतात.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *