पोलादपूर : शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री कै. प्रभाकर मोरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी सहभाग व नावनोंदणीसाठी इच्छूकांनी रासेयो अधिकारी प्रा. डॉ. राम बरकुले (9881823767), प्रा. डॉ. शैलेश जाधव (7218051321), आजीवन विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.नाथीराम राठोड (9272585815), प्रा. मनोज भगत (7507285039) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर व उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी केले आहे.