दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल

माथेरान:‘महेंद्र हा आमचा वाघ आहे. निवडणूक काळात अनेक संकटे आली पण  तो मुळीच घाबरला नाही. मी कर्जतकराना धन्यवाद देतो की तुम्ही शिवसेना पक्षाला साथ दिली आणि तुमचा महेंद्र आत्ता दुपटीने विकास करेल हा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याबद्दल काढले.
नुकताच विधानसभा निवडणूका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आशीर्वाद घेतले.खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदार संघातील जवळपास २९०० कोटी रुपयांची विकास कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तडीस नेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या मतदार संघातील जी काही प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहेत. ह्या मतदार संघात अत्यंत चुरस पहावयास मिळाली आहे परंतु केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात आमदार महेंद्र थोरवे यांनी झपाटून कामे केल्यामुळेच ह्या मतदार संघाचा कायापालट होत आहे. महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडुन छोटेखानी सत्कार होताना हा समस्त मतदार संघातील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *