८ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत आयोजन

 

राज भंडारी
पनवेल : हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी १ डिसेंबर रोजी वाशी येथे तर ८ डिसेंबर रोजी पनवेल येथे तसेच १५ डिसेंबर रोजी अलिबाग येथे रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी विजेंद्र जैन, प्रज्ञा कोळवणकर, प्रभात कोळवणकर, आशा सरकटे, विलास साठे, शागुप्ता गदने आदी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या रुपरेशेबद्दल माहिती दिली.
ज्ञान ध्यान केंद्रात १ डिसेंबर रोजी वाशी सेक्टर १५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तथा लेखक डॉ.अजित मगदूम, के.जे.सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्रिन्सिपॉल डॉ.विवेक सुन्नपवर आणि म.टा.सन्मान पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध अभिनेते अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दिनांक ८ डिसेंबर रोजी पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सकाळी १० ते १२ यावेळेत आयोजन करण्यात आले असून यावेळी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ.योगेश्वर दयाळ कौशिक आणि जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल कमिटी चेअरमन पवन भोईर यांच्या उपस्थितीत याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अलिबाग येथे पार पडणारा कार्यक्रम हा जे.एस.एम.कॉलेजच्या सभागृहात दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० यावेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड भूषण डॉ.के. डी. पाटिल, स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त डॉ.निहा राऊत आणि महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ध्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक निमंत्रण करण्यात आले आहे. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा!, असे आवाहन फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *