अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार
मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. दादांच्या खांद्यावर हात ठेवायची त्याची हिंमतच कशी होती असा संतप्त सवाल अमोल मिटकरी यांनी करीत राष्ट्रवादीचे पीआर करणाऱ्या नरेश अरोराच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला नोटीस पाठविणार असल्याचे म्हटले आहे.
आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचं श्रेय आपल्याकडे घेतलं. अशी टिकाही मिटकरी यांनी केली
अजित पवारांना मिळालेल्या यशामागे नरेश आरोरांच्या पीआर कंपनीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “हे सगळं खोटं आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची?
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, “मी जबाबदारीने बोलतोय, आमच्या भावना दुखल्या त्याचं काय? पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग 41 आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपले होते का? ज्या पद्धतीने तीन पीआर एजन्सीमध्ये एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची हिंमत झाली नाही त्या पद्धतीने डिझाईन बॉक्स एजन्सी प्रमोट करण्याची हिंमत त्यांनी केली कशी? याचा तीव्र शब्दात निषेध करतो. असे मिटकरी म्हणाले