मुंबई : होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या या महसुलात मुंबई विभागाचा वाटा ११५ कोटी ६९ लाख रुपये आहे. दरम्यान, रेल्वेने २०२३-२०२४ या मागील आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा एक कोटी ३१ लाख रुपयांचा अधिक महसूल मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांतही असाच प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एनएफआर’च्या माध्यमातून महसूल वाढीसाठी रेल्वेने त्यांच्या जागांचा वापर केला आहे. त्यात स्टेशनबाहेर होर्डिंग, एसी-नॉन एसी लोकल, मेल-एक्स्प्रेस ट्रेनवरील जाहिराती, रेल्वेस्थानकांवरील जाहिराती, डिजिटल स्क्रीन, रेस्टॉरंट ऑन व्हील्स, रेल्वे फलाटांवरील दुकानांतून मिळालेल्या महसुलाचा समावेश आहे. यातील सर्वाधिक वाटा सात एसी लोकलमधील जाहिरातींचा असून, त्याद्वारे वार्षिक १७.९४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, ७४ नॉन एसी लोकलच्या आतील आणि बाहेरील जाहिरातींमधून ५४.१३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *