मुंबई : लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद करता येणार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ह्यव्हीआयपीह्ण वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले.
त्यामुळे वाहनधारकांना जास्त पैसे मोजून पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंदणी केली करावी लागत आहे. पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. परंतु, उत्पन्नात वाढ झाली आहे. तर, आता वाहनधारकांचे आरटीओ कार्यालयातील फेऱ्या बंद करण्यासाठी सोमवारपासून ऑनलाइन सेवा सुरू केली जाणार आहे.
00000