मुंबई :भारतातील पोर्ट उद्योगात सर्वात जुनी असलेली १०४ वर्षाची मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आहे. स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या प्रेरणेतून १९९७ साली पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकाची सुरुवात झाली. तेव्हापासून गेली २७ वर्ष सातत्याने हा अंक निघत आहे. युनियनचे मुखपत्र असलेल्या “पोर्ट ट्रस्ट कामगार २०२४” या २८ व्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक, व्यंगकवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या शुभहस्ते व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, २८ नोव्हेंबरला सायंकाळी ०५.३० वाजता, कॉन्फरन्स हॉल, विजयदीप, सातवा मजला, बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. तरी आपण या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले आहे.
00000
