पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती वैश्विकस्तर यावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने २६ नोव्हेंबर १९७२ ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस” साजरा करण्याची घोषणा केली.त्यामुळे संपूर्ण जगात २६ नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.आज संपूर्ण जग सुरक्षीत रहावं असे सर्वांना वाटते.परंतु पर्यावरणाची ढासळती परीस्थिती पहाता. पृथ्वीतलावरील संपूर्ण मानवजाती व जीव-जंतु भयभित झाल्याचे दिसून येते.त्यामुळे आज जगाला पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज तसे पाहिले तर स्थल,जल,वायु मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाल्याचे दिसून येते.मानवाने जर पर्यावरणाला वाचविले तर जलप्रदूषण,वायुप्रदूषण व स्थलप्रदुषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरपूर मदत मिळु शकते.आज प्रदुषणामुळे संपूर्ण पर्यावरण ढासळले आहे यामुळे मानव, पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतू यांचे जगणे कठीण अत्यंत झाले आहे. आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात जंगल तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याचाच परीणाम पर्यावनावर मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो. भारतासह संपूर्ण जग विकासाकडे वाटचाल करीत आहे यात दुमत नाही.परंतु यात पर्यांवरणाची छल्ली व विटंबना मोठ्या प्रमाणात होतांना दिसते.भारतासह जगातील वाढती लोकसंख्या हीच पर्यावरण नियंत्रण ठेवण्यास मोठी अडचण असल्याचे मी समजतो.मानवाने आपल्या सुख- सुविधांसाठी पर्यावरणाकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आज पर्यावरणावर अशी परिस्थिती आहे की “जगावं की मरावं” कारण आज पर्यावरणाचा आधारस्तंभ “वृक्ष”आहे.परंतु मानवाने वृक्ष कटाईच केली नाही; तर वृक्षांना जळामुळा सकट त्याला उपडुन फेकले.यामुळेच आज पर्यावरण मानवापासुन भयभीत आहे. आज पर्यावरणावर सर्वच काही अवलंबून आहे.आज औषधोपयोगी वनस्पती पर्यावरणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे नस्तनाबुत होत व अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.आज पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे जंगलातील संपूर्ण प्राणीजाती आज शहरात, गावात प्रवेश करतांना दिसतात.यात हिंसक प्राणी शहरात व गावात प्रवेश करून मानव हानी व पाळीव प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणात होतांना दिसते.कारण जंगल संपदा नष्ट होत आहे यामुळे जंगलात रहाणारे पशु-पक्षी यांचे खान-पान ऐका-मेकांवर अवलंबून असते.परंतु जंगल तोडीमुळे अनेक प्रजाती लुप्त होतांना दिसते किंवा त्यांची शिकार होतांना दिसते किंवा पर्यावणाच्या ढासळत्या परीस्थितीमुळे मृत्यृशी झुंज देतांना अनेक पशु-पक्षी दीसतात.त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रथम जबाबदारी मानवजातीची आहे कारण मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.आज प्लास्टीकनेसुध्दा पर्यावरणाला प्रदुषीत केल्याचे दिसून येते.मानवाने स्वत:च्या स्वर्थासाठी पर्यावरणाला निचोडुन ठेवल्याचे दीसुन येते.आज जगात विश्र्व शांतीसाठी पर्यावण वाचवीण्याची गरज आहे.आज मानव जातींमध्ये वाढणारे आजार, अनेक व्याधी ह्या सर्व पर्यावरणाच्या बिघडत्या संतुलनामुळे दिसून येतात.यामुळे आज मानवाचे आयुष्यमान कमी झाल्याचे दिसून येते.पशुपक्षांचेतर जगने अत्यंत कठीण आहे.जगात वाढते कारखाने आणि जगातील युध्दसामुग्रीची होड व अनेक परमानु बॉंम्बच्या चाचण्या यामुळे संपूर्ण जग प्रदुषीत होतांना दिसते.आज भारतातील जिवंत उदाहरण म्हणजे,दिल्लीतील जहरीली हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडल्याचे दिसून येते. कारण दिल्लीतील प्रदुषणाने संपूर्ण सीमारेषा ओलांडल्याचे दिसून येते.कारण बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ ला दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) ४२६ च्यावर म्हणजेच अत्यंत गंभीर पातळीवर होता.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राजधानी दिल्लीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रदुषणामुळे वातावरण एवढे खराब झाले होते की ७९ विमानांना येण्यास विलंब झाला तर ६ विमानांचे मार्ग बदलविण्यात आले.यावरून आपण समजू शकतो की विमानांवर प्रदुषणाचा एवढा गंभीर परिणाम होवू शकतो तर मानवजाती, पशुपक्षी व अन्य जिवजंतुंवर कीती मोठा गंभीर आणि घातक परिणाम होत असेल हे दिल्लीच्या प्रदुषणावरून स्पष्ट दिसून येते.राजधानीतील प्रदुषण अत्यंत चिंताजनक पातळीवर गेल्याने शाळा, महाविद्यालय यांच्या बाबतीत प्रश्न चिन्ह उपस्थित झालेला आहे.त्याचप्रमाणे ५० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना घरूनच कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खाजगी कार्यालयांनाही बहुतांश कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम”सुविधा द्यावी असे आवाहन राज्य सरकारने खाजगी कार्यालयांना केले आहे.कारण प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस गडद होत चाललेला आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रदुषनामुळे संपूर्ण दिल्ली धुंधली झालेली आहे.जगातिल १०० प्रमुख शहरांच्या तुलनेत भारतातील तब्बल ३९ शहरे प्रदुषणाने संपूर्णपणे जखडलेले आहेत. म्हणजेच आज भारत प्रदुषणाचे माहेरघर झाल्याचे संपूर्ण चित्र दिसून येते.जगातिल प्रदुषणाच्या बाबतीत तुलना केली तर भारत प्रथम क्रमांकावर असुन यात ३९ शहरे आहेत.तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असुन ३० शहरे प्रदुषणाच्या बाबतीत अव्वल आहेत.त्या खालोखाल पाकिस्तान -९, बांगलादेश -५,ईरान-३, दक्षिण आफ्रिका -३, नेपाल -२, इंडोनेशिया -२ व इतर देशांतील ७ शहरे याप्रकारे “एस एंड पी ग्लोबल मोबिलिटी वेब प्रेझेंटेशन” या जागतिक संस्थेने नुकतीच १०० प्रदुषित शहरांची सुची जाहीर केलेली आहे यात भारताची चिंताजनक परिस्थिती दिसून येते. आज प्रदुषणामुळे दिल्ली गॅसचेंबर बनली की काय असे वाटत आहे.या महाभयानक परीस्थितीत दील्लीवासी “मास्क”चा मोठ्या प्रमाणात वापर करतांना दिसतात.यामुळे असे वाटते की “दील्लीमध्ये मास्क युग आले की काय असे वाटत आहे”. संयुक्त राष्ट्राने १९७२ ला पर्यावरण संरक्षण करण्याची संकल्पना जाहीर केली होती.परंतु याबद्दल कीती देश अलर्ट मोडवर आहेत हे पहाने गरजेचे आहे.पर्यावरण संरक्षण करण्याची घोषणा करणे वेगळे आहे.परंतु त्याला कृतित कोणता देश रूपांतरित करतो त्याला जास्त महत्त्व आहे. कारण आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे.त्यामुळे मानवजातीने आपल्या मृत्यृचीही व्यवस्था केल्याचे दिसून येते.मानवजातीने आता पर्यावरण वाचवीले नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे.याकरीता जगातील संपूर्ण देशांनी विश्र्व पर्यावरण संरक्षण दीवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला पाहिजे.वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर पर्यावरण संतुलित रहायला मोठी मदत मीळेल.त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाकरीता लोकसंख्येवर नियंत्रण असते गरजेचे आहे, वाढते शहरीकरण थांबवीले पाहिजे, कारखान्यांतील धुळ व दुषीत पाणी यांचा बंदोबस्त केला पाहिजे,भारतासह जगात अनेक वाहन दुषीत धुर ओकत असतात ते कुठेतरी थांबवीले पाहिजे.आज पर्यावरण विस्कळीत झाल्यामुळे व प्रदुषणामुळे मानवजातीवर अनेक आजारांचे संकट ओढावले आहे यात कॅन्सर,टीबी, मधुमेह,हार्ड अटॅक इत्यादीसह अनेक मोठे आजार मोठ्या प्रमाणात दीसुन येतात.आज भारत मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे.परंतु पर्यावरणाच्या बाबतीत मागे असल्याचे दिसून येते.याचे जीवंत उदाहरण म्हणजे”दील्लीतील प्रदुषण”. त्यामुळे भारताने खासकरून पर्यावरण संरक्षणासाठी युध्दपातळीवर कार्य करण्याची गरज आहे.गेल्या ५ ते १० वर्षांपासून जगात अनेक महाप्रलय, मोठ्या प्रमाणात सुनामी,ग्लेशीअर वितळने,अती पाऊस,अती उष्णता,अती थंडी,मोठ-मोठे जंगल वनवा लागुन जळुन खाक होने ह्या संपूर्ण घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने व पर्यावरणाची हत्या केल्याने ह्या घटना घडल्याचे स्पष्ट दीसुन येते.त्यामुळे आज पर्यावरणाला वाचविण्याकरिता जगातील संपूर्ण देशांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतात शहरांचे सौंदर्यकरन करण्याच्या उद्देशाने जंगल तोड करने बरोबर नाही.त्यामुळे भारत सरकारने जंगल तोड ताबडतोब थांबवली पाहिजे.यामुळे पर्यावण शुद्ध राहिल. पर्यावरन संरक्षण दिनाच्या निमित्ताने मी सरकारला एकच आव्हान करतो की जंगल तोड ताबडतोब थांबवली पाहिजे व ओसाड जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला पाहिजे.त्याचप्रमाणे जनतेला मी एकच आव्हा करतो की २६ नोव्हेंबर पर्यावरण संरक्षण दिवसाचे औचित्य साधून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एकतरी झाड लावावे जागा नसेल तर एखाद्या कुंडीत झाड लावावे व पर्यावरणाचे संरक्षण करावे.त्याचप्रमाणे सरकारने “घर तीथे झाड” ही मोहीम राबविली पाहिजे. वृक्ष लागवडीमुळे “गुरांना चारा, पक्षांना फळ व मानवाला सावली मिळेल”यांच्या संगमाने शुध्द हवा मिळुन पर्यावरणात आल्हाददायक वातावरण निर्माण होईल.आज संपूर्ण जगाला पर्यावरण वाचवीण्याची हीच संधी आहे ही संधी गमावून नये असे मला वाटते.आज पर्यावरण प्रदुषीत झाल्यामुळे नदी,नाले,तलाव, समुद्र प्रदुषीत झाले आहे.यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी विश्र्वातील संपूर्ण मानवजातीवर आहे त्या हेतुने सर्वांनी पावुले उचलली पाहिजे.पर्यावरण सुरक्षीत तर पृथ्वी सुरक्षीत,पृथ्वी सुरक्षीत मानव, पशु-पक्षी सुरक्षीत हेच धेय्य पुढे ठेवून पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे.आजच्या अत्याधुनिक युगात “मोबाईल टॉवर” मोठ्या प्रमाणात दीसुन येते यामुळेसुध्दा पर्यावरणावर व पशुपक्षांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतांना दिसतो.यावरसुध्दा नियंत्रण आणन्याची गरज आहे.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजि विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९३२५१०५७७९, नागपूर