उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी सार्थल पोलीस चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूदचा मुलगा सुहेल इक्बालसह ८०० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेत उपनिरीक्षक राठी जखमी झाले आहेत.

दरम्यान, मुरादाबादचे आयुक्त अंजनेय सिंह यांनी सोमवारी सांगितले की, संभल हिंसाचाराची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. ज्या भागात हिंसाचार झाला, तो भाग वगळता अन्य भागात दुकाने सुरू असून परिस्थिती सामान्य आहे. ज्या प्रकारचे पुरावे मिळत आहेत, ते पाहता दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल आणि एनएसएदेखील लावला जाईल.

याप्रकरणी आतापर्यंत एकूण ७ एफआयआर दाखल करण्यात आले असूनत्यापैकी संभळ पोलीस ठाण्यात ५ तर नखासा पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *