१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, मंचाचे अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष संजय कदम, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, सचिव हरेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.